- मनोगत -
मंगळवार 18 जून 2024 माझा वाढदिवस दरवर्षीप्रमाणेच कौटुंबिक पध्दतीने साजरा करणार वास्तविक वाढदिवस मोठ्या श्रीमंत लोकांची प्रदर्शन करण्याची हौस भागविण्याची मेजवानी करण्याची पध्दत प्रचलित आहे पत्रकार लेखक संपादक म्हणून अनेक प्रसिद्ध लोकांच्या वाढदिवसाच्या विशेषांक मी प्रकाशित केले मागील गेल्या 25 वर्षात विपुल लीखान केले साहीत्य कवित्व आणि पटकथा ही लीहील्या आता आँनलाईन वेबनार चा जमाना आहे युट्यूब व्हीडीओ चे मार्केटिंग झाले आहे सामाजिक आणि सार्वजनिक जीवनात दिखावा सुरू आहे आपल्या कर्तव्यनिष्ठेचा सर्वानाच विसर पडत चालला आहे दुर्दैवाने आपल्या भूमिकेशी कोणीच प्रामाणिक राहीले नाही प्रत्येकजण स्वताला न्यायदाता आणि दुसऱ्याला गुन्हेगार ठरवत आहे उपदेश करणे हा स्वभाव गुण अहंकार कुरवाळत आहे असो स्वतःबद्दल स्वताच्या आयुष्यात मागे वळून पाहताना डोकावताना स्वताचे प्रतिबिंब आरशात पाहून समाधान वाटते का हा प्रश्न स्वताला विचारण्यासाठी हा शब्द प्रपंच करावे रुपी भरावे ही म्हण प्रचलित आहे चांगल्याचे चांगले होते आणि वाईटाचे वाईट ही भावना सर्वत्र बोलली जाते पण निसर्गनियमानुसार सद्यपरिस्थितीत यावरचा संभ्रम दिसून येतो मी माझ्या व्यक्तिगत जीवनात कर्तव्य जबाबदारी आणि प्रामाणिकतेला प्राधान्य दिले स्वच्छ चरीत्र आणि मधुर वाणी जोपासली कधी कोणाचा हक्क आणि अधिकार मारला नाही थोरामोठ्यांच्या आदर सत्कार शिष्टाचार सांभाळला परंतू प्रत्येकाच्या मनाप्रमाणे आणि इच्छेनुसार न वागल्याने संशय आणि आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले वेगवेगळ्या भूमिकेत काम करत असताना लोकांच्या मर्जीप्रमाणे न वागता सदविवेक बुद्धीने जगलो वागलो प्रत्येकाच्या इच्छा आकांक्षा अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केला परंतु तरी माझ्या व्यक्तीमत्वांभोवती संशयकल्लोळ निर्माण करण्याचे पातक जवळच्याच लोकांनी केले आयुष्यात मी कधीच कोणाला भीत नाही ना कधी भिणार परंतु मन भाव भावना स्पंदनांचा अंश माझ्यात आहेच ना मी ही दुखावला जावू शकत नाही का? विशेषतः ज्यांना मी सहकार्य केले मदत केली त्यांच्या जाणीवेची तीव्रता कुठे लोप पावली कोणास ठाऊक आसो सामाजिक व्यवस्था परिवर्तन लढ्याचा पुरोगामी विचारांचा कार्यकर्ता पत्रकार लेखक संपादक म्हणून माझी सामाजिक आणि सांस्कृतिक सार्वजनिक जीवनातली भूमिका मला येथे महत्वाची वाटते हा लेख मी काही माझी प्रशंसा करण्यासाठी लिहीत नाही गैरसमज नसावा माझ्या मनातील खदखद आणि अदृश्य संवाद वाढविण्यासाठी केलेला माझ्याकडुन प्रयत्न आहे एक वडील एक नवरा मुलगा भाऊ मित्र कार्यकर्ता सर्व कौटुंबिक भुमिकेशी मी प्रामाणिकपणे जोडलो यांचे समाधान आहे एक मोठ्या सामाजिक व्यवसायिक परीवाराचा मी आता सदस्य आहे तथागत भगवान बुद्ध व बौधिसत्व परमपूज्य डाँ बाबासाहेब आंबेडकर यांच्या साम्यवादी न्यायवादी भूमिकेचा पाईक आहे सामाजिक व्यवस्था परिवर्तन समता न्याय तत्त्वांशी बांधिलकी मी स्वीकारली आहे सतत अविरत हा खडतर संघर्षमय प्रवास आपल्या साक्षीने सुरु आहे फक्त पाठीवर हात ठेवून लढ म्हणा जो सोबत येईल त्याला सोबत घेऊन आणि जो येणार नाही त्यांला सोडून हा जीवन प्रवास सुरु आहे 🙏मुकेश शिंदे
मोबाईल 8779671797