ठाणे लोकसभेचा गड महायुती चे उमेदवार नरेश म्हस्के जिंकणार!

 


प्रतिनिधी (नवी मुंबई) बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षेत मतदारांची उस्तुकता शिगेला पोहोचलेली व संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष केंद्रित झालेली निवडणुक अर्थात ठाणे लोकसभेचा गड  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू सहकारी असलेले उमेदवार नरेश म्हस्के जिंकणार असल्याचे चित्र नवी मुंबई जिल्हात फेरफटका मारल्यावर दिसून येते आहे नुकतीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सभा घेऊन त्यांच्या विजयावर शिक्कामोर्तब केले आहे तसेच महायुतीचे सर्व घटक पक्षांनी एकत्र येऊन काम केले आहे नरेश म्हस्के यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्यासाठी कंबर कसली आहे ठाणे मीरा भाईंदर बरोबर नवी मुंबई मधून नरेश म्हस्के मोठी आघाडी घेऊ शकतात महायुती ला ठाणे लोकसभा मतदारसंघात जिंकवण्यासाठी महायुतीचे कार्यकर्ते पदाधिकारी मंत्री आमदार नगरसेवक यांनी निर्धार केला आसून मतदारांनी सुध्दा नरेश म्हस्के यांना दिल्लीत पाठविण्याचा निश्चय केल्याचे मतदारसंघात बोलले जात आहे येत्या 4 जूनला ठाणे मतदारसंघात महायुतीचे नरेश म्हस्के यांच्या विजयाचा गुलाल उधळला जाणार असल्याचा विश्वास महायुतीच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला