मुकेश शिंदे यांना पत्रकारीता व जनसंपर्क क्षेत्रात पदवी प्रदान
प्रतिनिधी:भिमसंगाम वृत्तपत्राचे संपादक मालक व BMS न्युज चॅनेल चे संचालक व निवेदक जेष्ठ पत्रकार मुकेश शिंदे यांना महाराष्ट्र शासनाच्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या वतीने  दिनांक 20 डिसेंबर 2023 रोजी 29 व्या दीक्षान्त समारंभ प्रसंगी नाशिक  मुख्यालय येथे वृत्तपत्रविद्या व जनसंज्ञापन ही पदवी( डिप्लोमा) देऊन सत्कार सन्मान करण्यात आला मुकेश शिंदे हे गेली 22 वर्ष पत्रकारीता व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत आसून 2009 साली ही त्यांना नवी दिल्ली येथे भारतरत्न डाँ बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय फेलोशिप अवॉर्ड देउन गौरविण्यात आले होते आपल्या वैशिष्टय़पूर्ण कार्यातून त्यांनी आपली आगळीवेगळी ओळख निर्माण केली आहे सफाईदार सुत्रसंचालक युट्यूबर व स्पष्ट वक्ता म्हणून ते सुपरिचित आहेत समाजहितासाठी पत्रकारीता व राष्ट्रप्रेमी विचारांचा प्रचार आणि प्रसार हे त्यांची गुणवैशिष्ट्ये आहेत महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श समाजजीवनात वावरताना ते सांगतात पदवी व पदव्युत्तर प्रदान सोहळ्यानिमित्त सर्वत्र त्यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या जात आहेत