पत्रकार मुकेश शिंदे एक अष्टपैलू व्यक्तीमत्व
शोषित पिडीत उपेक्षित साधन विरहीत समाज जीवन कौटुंबिक कलह वयक्तीक प्रांप्रचिक संसारीक अडचणीचा सामना भौतिक जीवनात आपल्या वेगवेगळ्या गरजा भागवण्यासाठी माणूस संघर्ष करत आसतो आर्थिक सामाजिक मागासलेल्या व्यवस्थेत कर्तव्यदक्ष जबाबदार माणूस ही जर्जर होत असतो अशा एक ना अनेक संघर्षमय जख्मी यौध्दया पैकी एक नाव म्हणजे पत्रकार संपादक व सामाजिक प्रश्नाचे विश्लेषक लोकप्रिय निवेदक मुकेश शिंदे होय सुरुवातीचे अपुरे क्षिक्षण लहान वयात वडीलकीची जबाबदारी मिळेल ते काम करुन कुटुंबाची आर्थिक जबाबदारी पार पाडताना समाजाप्रति विशेषतःहा परम पुज्य डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराप्रति अतूट बांधिलकी जपली आणि जोपासली विद्यार्थी दक्षेपासून आंबेडकरी चळवळीमध्ये सक्रीय सहभाग होता परंतू मोठ्या प्रमाणात व्यक्त व प्रकट होता येत नसल्याने लेखणाची आवड सर्जनशीलता आणि अन्यायाची चीड आणि चाड त्यांना पत्रकारितेत घेऊन गेली अनेक नियतकालिकेतून लेखन करुन समाजातील विषम आणि धांमिक व्यवस्थेवर आसूड ओढले शब्दांना सत्याची धार या भूमिकेतून संपादक म्हणून गेली २० वर्ष भिमसंगाम नावाचे साप्ताहिक वृत्तपत्र प्रकाशित केले दरम्यान आपले राहीलेलं पदवी व पदव्युत्तर क्षिक्षण पूर्ण केले पज्ञकारीतेतील डिग्री डिप्लोमा पूर्ण केला आज BMS या यूट्युब चॅनेल च्या माध्यमातून उघडा डोळे आणि वापरा डोके टॅग लाईन घेऊन समाज प्रबोधन आणि जनजागृती करत आहेत आपल्या नेतृत्वाखालील भिमसंगाम बहुउद्देशीय सामाजिक संस्था (रजिस्टर) कार्यक्षेत्र महाराष्ट्र राज्य संघटनेचे कार्य सुध्दा नेटाने चालवित आहेत नशीब नेहमी हेलखावणी देत असताना ते आपल्या कार्यकर्तृत्वावर विश्वास ठेवून कार्यरत राहीले वन मॅन आर्मी प्रमाणे कार्य करत असताना अनेक दुर्धर आजाराचे पारितोषिक ही मिळाले त्या अंतर्गत झालेल्या शस्त्रक्रिया ही त्यांचे मनोबल कमी करु शकल्या नाहीत सतत कार्यरत राहाणे ह्या त्यांच्या स्वभावगुणातच त्यांचे वेगळेपण आहे अनेक राज्यस्तरीय व देशपातळीवरील प्रतिष्ठित पुरस्कार त्यांना सन्मानित करण्यात आले आहे आपल्या भूमिकेशी प्रमणिक राहून समाजात सामाजिक समता न्याय प्रस्तापित होण्याच्या प्रक्रियेत ते सहभागी आहेत जातीव्यवस्था नष्ट झाली पाहिजे भारतीय संविधान संसदीय लोकशाही चे संगोपन आणि संवर्धन झाले पाहिजे ही त्यांची आग्रही भूमिका आहे भेदभाव विरहीत समाज व्यवस्था निर्माण झाली पाहिजे ही त्यांची अंतरीक तळमळ आहे त्यासाठी कुतीशील कार्यक्रम नसल्याची खंत ते बोलून दाखवितात असे अष्टपैलू व्यक्तीमत्वांचे धनी असलेले नेहमी हसरे मनमिळावू स्वभावाचे हरहुन्नरी व्यक्तित्व पत्रकार मुकेश शिंदे यांचा आज रविवार दिनांक 18 जून 2023 रोजी 46 वा वाढदिवस जन्माला कुठे यावे हे काही आपल्या हातात नसते पण कसे इतरांना मार्गदर्शक जीवन जगणे हे नक्की आपल्या हातात असते मुकेश शिंदे साहेबांना उदंड निरोगी दीर्घआयुष्य लाभो ही तथागत आणि बौधिसत्वांच्या चरणी प्रार्थना मनोकामना व्यक्त करुन तूर्त येथेच थांबतो - एम एम सोनावणे